1 डिसेंबर 2019, चीन मधल्या वूहान शहरामध्ये एक 55 वर्षाचा व्यक्ती अचानक आजारी पडतो. सर्दी, खोकला, ताप आणि नंतर नयूमोनिआ आणि मृत्यू अगदी १५ ते २० दिवसातच!!. काही दिवसातच अश्या कितीतरी केसेस सुरु झाल्या. डॉक्टर लोकांना पण नक्की काय चालूय ते काळात नव्हत. नॉर्मल ताप असेल असाच कदाचित वाटलं असेल, पण जसजशा केसेस वाढायला लागल्या तेंव्हा Li Wenliang, नावाच्या ३४ वर्ष्याच्या एका डॉक्टर ने हे काहीतरी वेगळ आहे हे जगाला सांगितलं, आणि सुरु झाली लढाई एका अदृश्य अश्या शत्रूशी.

Dr. Li Wenlian – Who first warned the world. He lost his life fighting with virus.

कोरोना हे नाव या virus च्या दिसण्यावरून पडल. कोरोना म्हणजे crown, जेंव्हा हा virus मोक्रोस्कोप मध्ये दिसतो तेंव्हा त्याच्या वरती spikes दिसतात. असे एक नाही तर ५-६ कॉरोन virus चे प्रकार आहेत. आणि यातील ४ पासून आपल्याला काही जास्त धोका नाहीय. २०१९ मध्ये ज्या corona virus पासून लोक आजारी पडताहेत तो नवीन आहे. त्यावरती आजूनतरी कोणताही औषध नाहीयं. या virus पासून जो आजार होतोय त्याला कोविद-१९ म्हणजे Corona Virus Disease २०१९ म्हटलं गेलं.

अजून ४ महिने नाही झाले, आणि, 304,787 लोकांना या कोरोना virus ची लागन झाली आहे. आता ब्लॉग लिहितोय तेंव्हा १३००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय तर 196,994 लोक मृत्यूशी झुंझताहेत. आणि हे official numbers आहेत, म्हणजे ज्यांची नोंद झाली ते. खरा आकडा यापेक्षा कितीतरी पट मोठा असेल.

चीन मध्ये २० जानेवारी ला ५७१, २७ जानेवारी ला ५९७४, ३ फेब्रुवारी ला २०४४० करता करता काही दिवसातच हि संख्या ८५००० पेक्षा जास्त पोचली. आजपर्यंत चीनमध्ये ३२५५ लोक मृत्र्युमुखी पडली. चीन ने काही दिवसातच अतिशय कडक व्यवस्था राबवत हि थांबवली.

इटली हा एक खूप प्रगत देश आहे. इथली मेडिकल व्यवस्था, जगातील एक सुसज्य व्यवस्था मानली जाते. १९ फेब्रुवारी ला ३, २० फेब्रुवारी ला ४, २३ ला १५७, २७ फेब्रुवारी ला ६५५, ४ मार्च ला ३०८९, ८ मार्च ला ७३७५, १२ मार्च ला १२४६२, आणि आज ४७०२१. आणि हि संख्या दिवसाला हजारो नि वाढतेच आहे. इटली ने बघता बघता चीन ला overtake केला. आज इटली मध्ये ४८२५ लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि हि संख्या दिवसाला हजारो नि वाढते आहे. ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यांना त्याचा कुठूम्ब शेवटचा निरोपही देऊ शकत नाही कारण बाकीची फॅमिली quarantined आहे.

ही फक्त या दोनच देशांची गोष्ट नाहीय. फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, अमेरिका, स्वित्झरलँड, बेल्जियम, netherlands अश्ये १५० पेक्षा जास्त देश याच अनुभवातून जात आहेत. हे अतिशय प्रगत आणि कमी लोकसंख्या असलेले देश आहेत.

World map with Corona Cases. Mostly affected countries as of today. –

मी सध्या London मध्ये राहतो. गेल्या एक आठवड्यापासून घरातून काम करतोय. ५ दिवसापुरती ४ लोकांचा असणारा आकडा आज ४०० च्या वरती पोचलाय. २५० पेक्षा जास्त लोक वाचू नाही शकले. आणि गव्हर्नमेंट इतका प्रयत्न करूनही हा नंबर वाढतच चाललंय. UK मध्ये सरकारी हॉस्पिटल व्यवस्था आहे. जिथं सगळी काळजी सरकार घेता. हॉस्पिटल मधले बेड संपून गेलेत. गव्हर्नमेंट लोकल हॉटेल शी बोलणी करतंय, कि कदाचित त्यामुळे बेड ची क्षमता वाढवता येईल. परिस्तिथी खरंच बिकट आहे, पण UK चे नागरिक घरी राहून सहकार्य करताहेत.

सांगायचा उद्देश एवढाच, की भारतात अजूनही वेळ गेलेली नाही. आज देशात कमी लोक infected आहेत. त्यांनी जर काळजी घेतली तर हा प्रसार कमी होईल. सगळ्यांनीच जर काही दिवस काळजी घेतली तर हा धोका कमी करता येईल. फक्त गरज आहे ती, परिस्तिथी समझून घेण्याची. ही वेळ थोडी वेगळी आणि कठीण आहे. जर भारतात याचा प्रसार वरील देशाप्रमाणे झाला तर कदाचित आपला देश कितीतरी वर्ष मागे खेचला जाईल. कितीतरी लोकांना जीव गमवावा लागेल आणि जे वाचतील त्यांना आयुष्यभर याचा परिणाम सहन करत जगावं लागेल.

इंडियन गव्हर्नमेंट ने हा धोका ओळखून आधीच काही पावलं उचलली आहेत, पण गरज आहे ती सगळ्यांच्या सहकार्याची. लढाई कठीण आहे, आणि ती पण एका अदृश्य शत्रूशी आहे. काळजी घ्या, घरी राहा. कदाचित काय माहित, कुठूम्बसोबत वेळ घालवायला मिळत नाही, हा वेळ फॅमिली Time म्हणून पहा, कारण पैसे कितीही मिळतील , पण जीव एकदाच मिळतो.

Numbers as of today – 22nd March 2020

For more details – Have a look here –

  1. https://www.worldometers.info/coronavirus/

2. https://www.npr.org/sections/coronavirus-live-updates/2020/03/21/818971466/despite-lockdown-italys-coronavirus-cases-continue-dramatic-climb?t=1584837831906

3. https://www.nytimes.com/interactive/2020/world/coronavirus-maps.html