तो भित्रा होता,
त्याचा आत्मविश्वास गेला होता
त्याच्यासारखी मानसं हरलेली आहेत ….

सकाळी त्याच्या Suicide ची बातमी आली आणि अश्या कितीतरी कंमेंट्स सकाळपासून सोसिअल मीडिया वरती पहिल्या. आणि काहीतरी लिहावंसं वाटलं.

२०१४ च वर्ष. वर्षभर कष्ट केल्यानंतर India मधल्या एका टॉप च्या MBA कॉलेज ला admission भेटल होतं. अक्ख्या संपत्ती च्या कितीतरी पट असणारं २० लाखाचं लोण चा फॉर्म भरत असताना, हात थोडेसे थरथरत होते. त्या क्षणापासून ते MBA मध्ये प्लेसमेंट होईपर्यंत अनेक वेळा depression काय असतं, हे जवळून पहिल.

आपण प्रत्येकजण लहान मोठ्या मानसिक तणावातून जातो. असा एकही माणूस भेटणार नाही की जो सर्वथा परिपूर्ण आहे आणि ज्यानं कधीच हे अनुभवल नाही…

कदाचित तो मानसिक दृष्ट्या खचला असेल. नं सहन करण्याइतका मानसिक त्रास झाला असेल आणि त्यातून त्यांना हे पाऊल उचलला असेल. देव जाणे. प्रत्येकाची सहन करण्याची मानसिक शक्ती वेगळी असते. काही खूप सहन करू शकतात… काहीजण नाही. तो काय परिस्तिथीतून जात होता, हे कोणालाच माहिती नाही. So , त्यावरती कॉमेंट करणं बरोबर पण नाही.

आज आपल्याकडे whatsapp, skype , फेसबुक , Zoom , आणि २४ तास खिशात असलेला मोबाइल आहे, पण मनमोकळे पनाणं बोलू शकेल असे मित्र कुठे आहेत. आपल्या खास मित्रांसोबत बसून लास्ट टाइम कधी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या हे आठवतंय? नक्कीच खूप दिवस झाले असतील.

आज आई, वडील, भाऊ, बहीण, बायको, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड – अशी कितीतरी नाती आपल्या सभोवती आहेत. प्रत्येकजण आपआपला नातं अगदी चोख पार पडतोय, पण या सगळ्यामध्ये एक मित्र / मैत्रीण – जिच्यासोबत – ज्यांच्यासोबत बसून मनमोकळ्या गप्पा मारता येतील, कुठलीही बंधन किंवा दबाव नसेल – असा नातं नक्कीच कुठेतरी हरवलंय .

प्रत्येकाला मानसिक त्रास होतो . शाळेत असताना अभ्यासाचा त्रास, ११वी , १२ वी त, करिअर च्या सुरवातीचा, नंतर engineering, MBA चा, नंतर रेलशनशिप्स चा आणि ऑफिस मधल्या कामाच्या pressure चा … प्रत्येकजण या एकदा ना एकदा यातून नक्कीच जातो. नॉर्मल आहे. या सगळ्या मध्ये एक नातं नेहमी मदतीला धावून येत. ते म्हणजे – मित्र किंवा मैत्रीण.
शाळेत असताना बेंचवर शेजारी बसणार मित्र, ११वी – १२ वी त सोबत exams ची तयारी करणारा, इंजिनीरिंग मध्ये एखाद्या वेळी निवांत बसून बिअर सोबत मनमोकळ्या गप्पा मारणारा, किंवा ऑफिस मध्ये वैतागल असताना –

“अरे, टेन्शन घेऊ नको रे, बॉस चा रोजचाच आहे. जाऊदे भो*** “

असा म्हणून टेन्शन घालवणारा तो मित्र. हे एकंच मैत्रीचं नातं की ते नेहमी धावून येत.

बाकीच्या सगळ्या नात्यामध्ये – सगळ्यात आधी जर आपण मित्र / मैत्रीण झालो तर बऱ्याच गोष्टी ठीक होतील.

Depression ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकजण अनुभवता पण कोणी बोलत नाही. हा अनुभव अगदी नॉर्मल आहे. मी स्वतः अनेक वेळा depression चा चांगला अनुभव घेतलाय. मग ते MBA साठी घेतलेल्या भरमसाठ loan मुले असो, personal relationships मुळे असो व अगदी परवा परवा पर्यंत असलेल्या lockdown मुले असो. जेंव्हा जेंव्हा या परिस्तिथीतून मी जातो तेंव्हा तेंव्हा कोणी ना कोणी मित्र अथवा मैत्रीण मदतीला धावून येत. खूप सारं बोलणं होतं आणि मन मोकळ होत.

सुशांत सिंग राजपूत च्या M S Dhoni – Movie मधला एक Scene आणि dialogue आठवतोय, जेंव्हा धोनी ट्रेन स्टेशन वर बसलेला असताना त्यांच्या बॉस सोबत झालेला संवाद :

“अरे, बात करणा चाहिये, मन हलका हो जाता है. जब हमे फुल्ल टॉस मिलता है, तब हम हिट करते है |
outswinger आया तो छोड़ देते है |
इन-स्विंगर है तो, डिफेंड करते है |
और जब बाउंसर आता है तब हम छोड़ देते है… |

यही तो लाइफ है | लाइफ मी सब बॉल एक समान थोडे ना मिलेगा?”

Movie मध्ये बोलायला मित्र भेटला. पण कदाचित रिअल लाईफ मध्ये नाही.

चुका होतात, मानसिक त्रास होतो, डिप्रेशन येतं …. यासाठी आधी मित्र व्हा …. बाकीची नाती नंतर …..

Call that one of the friends, who you have not talked since long time. Get the burden out of the chest. Laugh louder and be happy.

RIP सुशांत….

Sushant Singh Rajput ---- Rest in Peace